Facebook Share

Thread Rating:
  • 0 Vote(s) - 0 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
१ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंतचे दिनविशेष | On This Day in History | Dinvishesh
#1
डिसेंबर १: जागतिक एड्स दिन

   इ.स. १९६५ - भारताच्या सीमा सुरक्षा दलाची स्थापना.

डिसेंबर २:

   इ.स. १९६३ - हॉलिवूडमधील प्रथम सफल भारतीय अभिनेता साबु दस्तगीरचे निधन.


डिसेंबर ४:

   इ.स. १९७१ - ऑपरेशन ट्रायडेंट नावाखाली भारतीय नौसेनेचा पाकिस्तानच्या कराची शहरावर हल्ला. दोन विनाशिकांसह तीन पाकिस्तानी युद्धनौका बुडाल्या, अनेक उद्ध्वस्त.

डिसेंबर ५:

   १९८९ - फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला.

जन्मः

   १९४३ - डॉ.लक्ष्मण देशपांडे, मराठी लेखक, दिग्दर्शक व कलाकार.

डिसेंबर ६:


   इ.स. १९५६ - डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथे निधन.


डिसेंबर ७:

   इ.स. १९७५ - इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर आक्रमण केले.


डिसेंबर ८:

   इ.स. १९८० - जॉन लेननची न्यूयॉर्कमध्ये हत्या.


डिसेंबर ९:


   १९०० - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धांची सुरवात.
   १९६९ - टांझानिया (पूर्वीचे टांगानिका) - स्वातंत्र्य दिन.
   १९९५ - बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ.
   २००३ - हिंदी चित्रपट अभिनेते देव आनंद यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

डिसेंबर १०:

डिसेंबर ११:

   इ.स. १९६९ - भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदचा जन्म.


डिसेंबर १२:


   १९६३ - केन्याला  युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

जन्मः

   १९४० - शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष.

मृत्यू:

   १९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतीकोशाचे जनक.

डिसेंबर १३:

   इ.स. २००१ - भारतीय संसदेवर अतिरेक्यांचा हल्ला.

डिसेंबर १४:

   इ.स. १९६२ - नासाचे मरिनर २  जगातले पहिले अवकाशयान झाले जे शुक्र ग्रहाच्या जवळुन यशस्वी रीत्या उडाले.

डिसेंबर १५:

डिसेंबर १६:

डिसेंबर १७:

डिसेंबर १८:

   इ.स. १६४२ - आबेल तास्मान न्यूझीलँडला पोचणारा प्रथम युरोपियन झाला.

डिसेंबर १९:

   इ.स. १९०५ - लंडनमध्ये पहिली रुग्णवाहिका सेवा सुरू झाली
   इ.स. १९६१ - भारताने दमण आणि दीव पोर्तुगालकडून काबीज केले
   इ.स. १९६३ - झांझिबारला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य
   इ.स. १९७२ - अपोलो १७, चंद्रावर पोचलेले शेवटचे समानव अंतराळयान युजीन सेमन, रॉन एव्हान्स व हॅरिसन श्मिट यांसह पृथ्वीवर परतले
   इ.स. २००१ - व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'च्या पुतळ्याचे पुणे येथे अनावरण
   २०१० - सचिन तेंडुलकरने कसोटी सामन्यातील विक्रमी ५० वे शतक केले. हा विक्रम त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्‌स पार्क या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये केला
   २०१० - राहूल द्रविडने कसोटी सामन्यातील १२,००० धावांचा टप्पा पार केला. हा विक्रम त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्‌स पार्क या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये केला

डिसेंबर २०:

इ.स. १९४५मधील कोलकाता

   इ.स. १९४२ - दुसरे महायुद्धात जपानने कोलकातावर (इ.स. १९४५ मधील छायाचित्र दाखवले आहे) बॉम्बहल्ला चढवला.

डिसेंबर २१:


   इ.स. १९५८ - फ्रांसमधील निवडणुकांत ७८.५% मते मिळवून चार्ल्स दि गॉल राष्ट्राध्यक्षपदी.

डिसेंबर २२:

   इ.स. १८५१ - जगातील पहिली मालगाडी भारतात रूडकी येथे चालविण्यात आली.

   इ.स. १९८९ - बर्लिनचे ब्रांडेनबर्ग गेट ३० वर्षांनी खुले. पूर्व आणि पश्चिम जर्मनीची फाळणी संपुष्टात.

डिसेंबर २३:

   इ.स. १९४० - हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमान कारखाना वालचंद हिराचंद यांनी म्हैसूर राज्यात सुरू केला.
   इ.स. २००४ - माजी भारतीय पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे निधन.
   इ.स. १९४७ - बेल लॅबमध्ये प्रथमत: ट्रांझिस्टरचे प्रदर्शन.


डिसेंबर २४:भारतीय राष्ट्रीय ग्राहक दिन

जन्म:

   १८९९ - पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी, मराठी लेखक .
   १९२५ - मोहम्मद रफी, पार्श्वगायक.

मृत्यू:

   १५२४ - वास्को दा गामा, पोर्तुगीज खलाशी.


डिसेंबर २५: नाताळ

डिसेंबर २६:


   इ.स. २००४ - हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी.


डिसेंबर २७:


   इ.स. १९७९ - सोवियेत संघाच्या सैन्याने अफगाणिस्तानच्या  राष्ट्राध्यक्ष हफीझुल्लाह अमीनची हत्या केली व आपले सरकार तेथे बसवले.


डिसेंबर २८:

   इ.स. १९९९ - सपामुर्रात नियाझोवने स्वतःला तुर्कमेनिस्तानचा  आजन्म राष्ट्राध्यक्ष घोषित केले.


डिसेंबर २९:

   इ.स. १९११ - सुन यात्सेन चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी.

डिसेंबर ३०:

१९३१चा स्वतंत्र भारताचा आझाद हिंद सेनेचा ध्वज

   १९४३ - नेताजी सुभाषचंद्र बोसनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज(चित्रित) फडकवला.

मृत्यू:

   १९७१ - विक्रम साराभाई, भारतीय अंतराळतज्ञ.

डिसेंबर ३१:
   २००७ - मराठी विकिपीडियावर १५,००० वा लेख लिहिला गेला.

जन्म:

   १९१० - मल्लिकार्जुन मन्सूर, जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक.
   १९०७ - हरिवंशराय बच्‍चन हिंदी कवी.

मृत्यू:

   १९२६ - इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे.
   १९९७ - स्वरराज छोटा गंधर्व, नामवंत गायक-अभिनेते.


Forum Jump:


Users browsing this thread: 1 Guest(s)