Facebook Share

Thread Rating:
  • 0 Vote(s) - 0 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पर्यंतचे दिनविशेष | On This Day in History | Dinvishesh
#1
ऑगस्ट १:

    १२९१ - स्वित्झर्लंड राष्ट्राची रचना.

    १४९८ - क्रिस्टोफर कोलंबसने व्हेनेझुएलात पाउल ठेवले.

    १८३८ - त्रिनिदाद व टोबेगोतील गुलामांना मुक्ती.

    १९३६ - बर्लिनमध्ये अकरावे ऑलिंपिक खेळ सुरू.

    १९९६ - मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला.



जन्म:



    १० - क्लॉडियस, रोमन सम्राट.

    १९१० - मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू.

    १९२४ - फ्रँक वॉरेल, वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू.



मृत्यू:



    १९२० - बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक

    १९२९ - सिड ग्रेगरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

    १९९९ - निरद चौधरी, इंग्लिश लेखक.



ऑगस्ट २:



    १७९० - अमेरिकेतील पहिली जनगणना सुरू.

   १९३४ - अ‍ॅडॉल्फ हिटलर जर्मनीच्या फ्युररपदी.

    १९९० - इराकने कुवैतवर आक्रमण केले.



जन्म:



    १६९६ - महमूद पहिला, ओट्टोमन सम्राट.

    १९५८ - अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू.



मृत्यू:



    ६८६ - पोप जॉन पाचवा

    १९२३ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष.



ऑगस्ट ३:



    १७८३ - जपानमध्ये माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक. ३५,००० ठार.

    १९६० - नायजरला फ्रांसपासून स्वातंत्र्य.

    १९८१ - अमेरिकेच्या १३,००० हवाई वाहतुक नियंत्रकांनी संप पुकारला.



जन्म:



    १८५६ - आल्फ्रेड डीकिन, ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान.

    १८६७ - स्टॅन्ली बाल्डविन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

    १९५६ - बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू.



मृत्यू:



    ११८१ - पोप अलेक्झांडर तिसरा.

    १९९३ - स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.

    २००७ - सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका.





ऑगस्ट ४:



    १९६४ - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेच्या यु.एस.एस. मॅडोक्स व यु.एस.एस. सी. टर्नर जॉय या दोन युद्धनौकांवर हल्ला झाल्याचे वृत्त. येथून युद्धास गंभीर वळण लागले. अनेक वर्षांनी असे सिद्ध झाले की हा हल्ला झालाच नव्हता.

    १९८३ - थॉमस संकरा बर्किना फासोच्या (तेव्हाचे अपर व्होल्टा) राष्ट्राध्यक्षपदी.

    १९८४ - अपर व्होल्टाने आपले नाव बदलुन बर्किना फासो असे ठेवले.

    १९९१ - क्रुझ शिप ओशनोस दक्षिण आफ्रिकेजवळ बुडाली. बरेचसे खलाशी व अधिकार्‍यांनी पळ काढला. सगळ्या ५७१ प्रवाश्यांना वाचवण्यात यश आले.

    २००६ - आनंद सत्यानंद न्यू झीलँडच्या गव्हर्नर-जनरलपदी.





जन्म:



    १७९२ - पर्सी शेली, इंग्लिश कवी.

    १९२९ - किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक.

    १९६१ - बराक ओबामा, अमेरिकन राजकारणी.



ऑगस्ट ५:



    १८६१ - अमेरिकन गृहयुद्ध - युद्धाच्या खर्चास हातभार लागावा म्हणून अमेरिकन सरकारने प्रथमतः आयकर लागू केला.

    १९१४ - जगातील पहिला विद्युतचलित वाहतूक नियंत्रक दिवा अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरात  सुरू झाला.

    १९४४ - दुसरे महायुद्ध - ऑस्ट्रेलियाच्या कौरा गावाजवळील युद्धबंद्यांच्या तुरुंगातून ५४५ जपानी युद्धबंदी पळाले. बव्हंशी मारले गेले व उरलेल्यांपैकी मोठ्या संख्येने आत्महत्या केली.



जन्म:



    १८१५ - देओदोरो दा फॉन्सेका, ब्राझिलचा पहिला राष्ट्राध्यक्ष.

    १८९० - दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.

    १९०८ - हॅरोल्ड होल्ट, ऑस्ट्रेलियाचा १७वा पंतप्रधान.

    १९६९ - वेंकटेश प्रसाद, भारतीय क्रिकेट खेळाडू.





ऑगस्ट ६:





    १५३८ - गाँझालो हिमेनेझ दि केसादाने कोलंबियामध्ये बोगोटा शहराची स्थापना केली.

    १८२५ - बोलिव्हियाला स्पेनपासून स्वातंत्र्य.

    १९०१ - ओक्लाहोमामधील कायोवा जमातीसाठी राखून ठेवण्यात आलेली जमीन श्वेतवर्णीयांना बळकावण्याची मुभा देण्यात आली व त्याद्वारे या जमातीला स्थलांतर करण्यास भाग पाडण्यात आले.

    १९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर एनोला गे या नावाच्या विमानातून लिटल बॉय नाव दिलेला परमाणु बॉम्ब टाकला. अंदाजे ७०,००० क्षणात ठार तर अजून हजारो भाजलेले पुढील काही वर्षांत किरणोत्सर्गाने मृत्युमुखी.



जन्म:



    १८०९ - आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन(चित्रित), इंग्लिश कवी.

    १८८१ - अलेक्झांडर फ्लेमिंग, स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ.

    १९२८ - अँडी वॉरहोल, अमेरिकन चित्रकार.

    १९७० - एम. नाइट श्यामलन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.



मृत्यू:



    २५८ - पोप सिक्स्टस दुसरा.

    ५२३ - पोप हॉर्मिस्दस.

    १४५८ - पोप कॅलिक्स्टस तिसरा.

    १९७८ - पोप पॉल सहावा.

    २००२ - एड्सगर डिक्स्ट्रा, डच संगणकशास्त्रज्ञ.





ऑगस्ट ७:





मृत्यू:



    १९४१ - रवींद्रनाथ टागोर, बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेते.



ऑगस्ट ८:



    १५०९ - सम्राट कृष्णदेवरायाचा राज्याभिषेक व विजयनगर साम्राज्याची स्थापना.

    १९४२ - अखिल भारतीय काँग्रेस समितीने भारत छोडो मोहिमेस सुरुवात केली.

    १९४९ - भूतानच्या राष्ट्राची स्थापना.



ऑगस्ट ९:



    १०४८ - २३ दिवस पोपपदी राहिल्यावर पोप दमासस दुसर्‍याचा मृत्यू.

    ११७३ - पिसाच्या मनोर्‍याचे बांधकाम सुरू. बांधकाम संपण्यास २०० वर्षे लागलेला हा मनोरा चुकीने कलता बांधला गेला.

    १९४२ - चले जाव आंदोलन - मुंबईत महात्मा गांधींना अटक.

    १९४५ - जपानच्या नागासाकी शहरावर अमेरिकेने परमाणु बॉम्ब टाकला. ७०-९०,००० व्यक्ती काही क्षणांत ठार, असंख्य जखमी. इतर हजारो व्यक्ती पुढील काही वर्षात आजाराने मृत्युमुखी.



जन्म:



    १९११ - खुरशेद मेहेरहोमजी, भारतीय क्रिकेट खेळाडू.

    १९३९ - रोमानो प्रोडी, इटलीचा पंतप्रधान.



मृत्यू:



    १९६२ - हर्मान हेस, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक.

    १९६९ - सेसिल फ्रँक पोवेल, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.





ऑगस्ट १०:



    १५१९ - फर्डिनांड मेजेलन पाच जहाजे घेउन पृथ्वी-प्रदक्षिणेसाठी निघाला.

    १८४६ - जेम्स स्मिथसनच्या ५,००,००० डॉलरच्या देणगीने स्मिथसॉनियन इंस्टीट्युटची स्थापना.

    १९२० - पहिले महायुद्ध-सेव्ह्रेसचा तह - दोस्त राष्ट्रांनी ओस्मानी साम्राज्य आपसांत वाटून घेतले.

    १९८८ - दुसर्‍या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेने प्रत्येकी २०,००० डॉलर देण्याचे कबूल केले.



जन्म:



    १८६० - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीततज्ञ.

    १८७४ - हर्बर्ट हूवर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.



मृत्यू:



    १९७६ - बर्ट ओल्डफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

    १९८० - याह्या खान, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.

    २००० - गिल्बर्ट पार्कहाउस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.



ऑगस्ट ११:



    २००८ - अभिनव बिंद्राने १० मी. हवाई रायफल मध्ये भारताचे सर्वप्रथम वैयक्तिक सुवर्णपदक मिळवले. हे भारताचे २८ वर्षांनंतरचे पहिले सुवर्णपदक आहे.



ऑगस्ट १२:



    १२८१ - जपानवर चाल करून येणारे कुब्लाई खानचे आरमार वादळात नष्ट.

    १८३३ - शिकागो शहराची स्थापना.

    १९०८ - सर्वप्रथम फोर्ड मॉडेल टी कार तयार झाली.

    २००० - रशियाची कुर्स्क ही पाणबुडी बॅरंट्स समुद्रात बुडाली.

    २००५ - श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कडिरगमारची हत्या.



जन्म:



    १८५९ - कॅथेरिन ली बेट्स, अमेरिकन कवियत्री.

    १८८७ - इर्विन श्रोडिंजर, नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ.

    १९१९ - विक्रम साराभाई, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.

    १९२४ - मुहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा हुकुमशहा व राष्ट्राध्यक्ष.

    १९४९ - मार्क नॉप्फलर, स्कॉटिश संगीतकार.



मृत्यू:





ऑगस्ट १३:



जन्म:



    १८९८ - प्रल्हाद केशव अत्रे, मराठी लेखक, पत्रकार, राजकारणी.

    १९३३ - रिचर्ड बी. अर्न्स्ट, नोबेल पारितोषिक विजेता स्विस रसायनशास्त्रज्ञ.





ऑगस्ट १४:





ऑगस्ट १५: भारतीय स्वातंत्र्यदिन



    १८२४ - अमेरिकेतील गुलामगिरीपासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.

    १९१४ - पनामा कालव्यातून पहिले जहाज पार झाले.

    १९४५ - दुसरे महायुद्ध - जपानने शरणागती पत्करली.

    १९४७ - भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

    २००७ - पेरूजवळ पॅसिफिक महासागरात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप. ५१४ ठार, १,०९० जखमी.



जन्म:



    १७६९ - नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचा सम्राट.

    १८७२ - श्री ऑरोबिंदो, भारतीय तत्त्वज्ञानी.

    १९४५ - बेगम खालेदा झिया, बांगलादेशची पंतप्रधान.



मृत्यू:



    १९७५ - शेख मुजिबुर रहमान, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.

    २००४ - अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री.





ऑगस्ट १६:



    १८९६ - अलास्कातील क्लॉन्डाइक नदीच्या उपनदीत सोने सापडले. क्लॉन्डाइक गोल्ड रश सुरू.

    १९६४ - व्हियेतनाम युद्ध - दक्षिण व्हियेतनाममध्ये क्रांती. जनरल न्विन खान्हने दुआँग व्हान मिन्हला पदच्युत केले.

    १९८७ - नॉर्थवेस्ट एरलाईन्स फ्लाइट २५५ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान डेट्रोइट विमानतळावर कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली.

    २००५ - वेस्ट कॅरिबिअन एरवेझ फ्लाइट ७०८ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान व्हेनेझुएलातील माचिकेस विमानतळावर उतरताना कोसळले. १६० ठार.



जन्म:



    १९१३ - मेनाकेम बेगिन, इस्रायेलचा पंतप्रधान.

    १९५० - जेफ थॉमसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.



मृत्यू:



    १७०५ - जेकब बर्नोली, स्विस गणितज्ञ.

    १८८६ - श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञानी.

    १९७७ - एल्विस प्रेसली, अमेरिकन गायक, अभिनेता.

    २००३ - इदी अमीन, युगांडाचा हुकुमशहा.



ऑगस्ट १७:



    १८६२ - अमेरिकेत आपल्याच जमिनींवरुन हुसकून लावलेल्या लकोटा जमातीच्या लोकांनी मिनेसोटा नदीच्या किनारी असलेल्या श्वेतवर्णीय वसाहतींवर हल्ला केला.

    १९६९ - कॅटेगरी ५ हरिकेन कॅमिल मिसिसिपीच्या किनार्‍यावर आले. २४८ मृत, १,५०,००,००,००० डॉलरचे नुकसान.

    १९७९ - एरोफ्लोत विमान-वाहतूक कंपनीच्या दोन विमानांची युक्रेनमध्ये टक्कर. १५६ ठार.

    १९८८ - विमान अपघातात पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झिया उल-हक व अमेरिकन राजदूत आर्नोल्ड रफेल ठार.



जन्म:



    १८४४ - मेनेलेक दुसरा, इथियोपियाचा सम्राट.

    १९२६ - ज्याँग झमिन, चीनचा राष्ट्राध्यक्ष.

    १९३२ - व्ही.एस. नायपॉल, इंग्लिश लेखक.

    १९३३ - जीन क्रांट्झ, नासाचा उड्डाण निदेशक.

    १९७७ - थिएरी ऑन्री, फ्रेंच फुटबॉल खेळाडू.



मृत्यू:



ऑगस्ट १८:



    १२०१ - रिगा शहराची स्थापना.

    १९७१ - व्हियेतनाम युद्ध - ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलँडने आपले सैनिक व्हियेतनाममधून काढून घेण्याचे ठरवले.

    २००८ - पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफने राजीनामा दिला.



जन्म:



    १६९२ - लुई हेन्री, डुक दि बर्बन, फ्रांसचा पंतप्रधान.

    १६९९ - थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे.

    १७५० - अँतोनियो सालियेरी, इटालियन संगीतकार.

    १८७२ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक.

    १९६२ - फेलिपे काल्डेरॉन, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.



मृत्यू:



    १२२७ - चंगीझ खान, मंगोल सम्राट.

    १९४० - वॉल्टर पी. क्रायस्लर, अमेरिकन उद्योगपती.

    १९४५ - नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी.

    १९९८ - पर्सिस खंभाता, भारतीय अभिनेत्री.

    २००८ - नारायण धारप, मराठी लेखक.





ऑगस्ट १९:



    १६६६ - दुसरे अँग्लो-डच युद्ध-होम्सची होळी - रियर अॅडमिरल रॉबर्ट होम्सने नेदरलँड्सच्या टेर्शेलिंग बेटावर हल्ला चढवून १५० व्यापारी जहाजे जाळली.

    १९१९ - अफगाणिस्तानला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

    १९५३ - सी.आय.ए.ने इराणमध्ये मोहम्मद मोसादेघचे सरकार उलथवून शाह मोहम्मद रझा पहलवीला सत्तेवर बसवले.

    १९५५ - हरिकेन डायेनने अमेरिकेच्या ईशान्य भागात २०० बळी घेतले.

    १९८० - सौदी अरेबियातील रियाध शहराच्या किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौदिया फ्लाईट १६३ हे लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार प्रकारचे विमानचे आपत्कालीन परिस्थीतीत उतरले. नंतर लागलेल्या आगीत ३०१ ठार.

    २००३ - इराकमधील संयुक्त राष्ट्रांच्या दूतावासावर आत्मघातकी हल्ला. राजदूत सर्जियो व्हियैरा डि मेलोसह २२ ठार.



ऑगस्ट २०:



   १७७५ - स्पेनने तुसॉन, अ‍ॅरिझोना येथे किल्ला बांधून शहर स्थापले.

    १९०० - जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.

    १९१४ - पहिले महायुद्ध - जर्मनीने ब्रसेल्स काबीज केले.

    १९६८ - २ लाख सैनिक व ५,००० रणगाड्यांसह सोवियेत संघ व इतर राष्ट्रांनी चेकोस्लोव्हेकियावर चढाई केली.

    २००८ - स्पानएर फ्लाइट ५०२२ हे माद्रिद पासून ग्रान केनेरियाला निघालेले विमान माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर धावपट्टीवरुन घसरले. १५३ ठार. १८ बचावले.



जन्म:



    १७७९ - जोन्स जेकब बर्झेलियस, स्विस रसायनशास्त्रज्ञ.

    १८३३ - बेंजामिन हॅरिसन, अमेरिकेचा २३वा राष्ट्राध्यक्ष.

    १९४४ - राजीव गांधी, भारतीय पंतप्रधान.

    १९४६ - एन.आर. नारायण मुर्ती, भारतीय उद्योगपती.



मृत्यू:



    १९८४ - पॉल डिरॅक, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.

    १९९७ - प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक.



ऑगस्ट २१: जन्म:



    १७६५ - विल्यम चौथा, इंग्लंडचा राजा.

    १७८९ - नारायण श्रीधर बेंद्रे, भारतीय/मराठी चित्रकार.

    १९७५ - सायमन कटिच, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.



मृत्यू:



    १९४० - लेऑन ट्रॉट्स्की, रशियन क्रांतिकारी.

    १९७८ - विनू मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू

    १९३१ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक.

    १९९५ - सुब्रमण्यम चंद्रशेखर, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ

    २००१ - शरद तळवलकर, मराठी चित्रपटअभिनेता

    २००६ - उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ख्यातनाम भारतीय सनईवादक.



ऑगस्ट २२:



जन्म:



    १७६० - पोप लिओ बारावा.

    १९०४ - डेंग श्यावपिंग, चीनचा राष्ट्राध्यक्ष.

    १९१५ - एडवर्ड झेझेपानिक, पोलंडचा पंतप्रधान.

    १९५५ - चिरंजीवी, तेलुगू चित्रपट अभिनेता.

    १९६४ - मॅट्स विलँडर, स्वीडनचा टेनिस खेळाडू.



ऑगस्ट २३:



    १३०५ - देशद्रोहाच्या आरोपावरुन स्कॉटलंडच्या विल्यम वॉलेसचा वध.

    १७०८ - मैडिंग्नु पम्हैबाचा मणिपूरच्या राजेपदी राज्याभिषेक.

    १९१४ - पहिले महायुद्ध - जपानने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले व चीनच्या किंग्दाओ शहरावर बॉम्बफेक केली.

    १९३९ - दुसरे महायुद्ध-मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार - या कराराच्या गुप्त अटींनुसार जर्मनी व सोवियेत संघाने बाल्टिक देश, फिनलंड, रोमेनिया व पोलंडची आपापसात वाटणी करून घेतली.

    १९४२ - दुसरे महायुद्ध-स्टालिनग्राडची लढाई सुरू.



जन्म:



    १८५२ - क्लिमाको काल्देरॉन, कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष.

    १९०९ - सिड बुलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

    १९६३ - रिचर्ड इलिंगवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

    १९६७ - रिचर्ड पेट्री, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

    १९७३ - मलाइका अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.



मृत्यू:



    ६३४ - अबु बकर, अरब खलीफा.

    १८०६ - चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलंब, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.

    १८९२ - देओदोरो दा फॉन्सेका, ब्राझिलचा पहिला राष्ट्राध्यक्ष.



ऑगस्ट २४:



ऑगस्ट २५:



    १६०९ - गॅलेलियोने आपल्या प्रथम दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.

    १७१८ - न्यू ऑर्लिअन्स शहराची स्थापना.

    २००३ - मुंबईत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या दोन कार-बॉम्बस्फोटांमध्ये ५२ ठार.

    २००७ - हैदराबादमध्ये अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ४३ ठार.



जन्म:



    १८६७ - मायकेल फॅरेडे, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.

    १९२३ - गंगाधर गाडगीळ, मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ.

    १९३० - शॉन कॉनरी, स्कॉटिश अभिनेता.

    १९६२ - तस्लीमा नसरीन, बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका.



मृत्यू:



ऑगस्ट २६:



    १३०३ - अलाउद्दीन खिल्जीने चित्तोडगढ जिंकले.

    १९२० - अमेरिकेच्या संविधानातील १९वी दुरुस्ती अमलात आली व स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला.

    १९४२ - ज्यूंचे शिरकाण युक्रेनच्या चोर्तकिव शहरात जर्मन पोलिसांनी ज्यूंना घराघरातून बाहेर काढले. ५०० आजारी व बालकांची हत्या करून उरलेल्यांना रेल्वेच्या वाघिणींतून छळछावणीत पाठवून दिले.

    २००८ - रशियाने जॉर्जियाचे अब्खाझिया आणि दक्षिण ओसेशिया हे प्रांत स्वतंत्र असल्याचे परस्पर जाहीर केले.



जन्म:



    १९१० - मदर तेरेसा, समाजसेविका; नोबेल पारितोषिक विजेत्या, भारतरत्न.

    १९२२ - गणेश प्रभाकर प्रधान, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ



मृत्यू:



    १९४८ - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी नाटककार, 'केसरी'चे संपादक





ठळक घटना आणि घडामोडी:



    १९६२ - नासा चे मानव-विरहित यान मरिनर २ चे शुक्राकडे प्रस्थान



जन्म:



    १९२५ - नारायण धारप, मराठी लेखक

    १९७२ - दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली, भारतिय मल्ल

    १९७४ - मोहम्मद युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू

    १९८० - नेहा धुपिया, भारतीय अभिनेत्री



मृत्यू:



    ८२७ - पोप युजिन दुसरा

    १९७६ - मुकेश, भारतीय पार्श्वगायक



ऑगस्ट २८:



जन्म:



    १०२५ - गो-राइझाइ, जपानी सम्राट.

    १५८२ - तैचांग, जपानी सम्राट.

    १७४९ - योहान वोल्फगांग फॉन ग्यॉटे, जर्मन साहित्यिक.

    १८२८ - लिओ टॉल्स्टॉय, रशियन साहित्यिक.

    १८९६ - फिराक गोरखपुरी, उर्दू कवी.

    १९३८ - पॉल मार्टिन, कॅनडाचा पंतप्रधान.

    १९८३ - लसित मलिंगा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.



मृत्यू:



    १९६९ - रावसाहेब पटवर्धन, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत.

    २००१ - व्यंकटेश माडगूळकर, मराठी लेखक, चित्रकार, शिकारी, पटकथाकार.





ऑगस्ट २९:



जन्म:



    १८४२ - आल्फ्रेड शॉ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

    १८६२ - अँड्रु फिशर, ऑस्ट्रेलियाचा पाचवा पंतप्रधान.

    १८८० - लोकनायक बापूजी अणे (माधव श्रीहरी अणे), भारतीय स्वातंत्र्यसैनिक.

    १९०१ - विठ्ठलराव विखे पाटील, भारतातील सहकार चळवळीतील अग्रणी.

    १९०५ - ध्यानचंद, भारतीय हॉकीपटू.

    १९३६ - जॉन मेककेन, अमेरिकन राजकारणी.

    १९५८ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक, संगीतकार.

    १९५९ - अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता.



मृत्यू:



    १५३३ - अताहुआल्पा, पेरूचा शेवटचा इंका राजा.

    १७९९ - पोप पायस सहावा.

    १९०४ - मुराद पाचवा, ओट्टोमन सम्राट.

    १९०६ - बाबा पदमनजी (बाबा पदमनजी मुळे), मराठीतील ख्रिस्ती साहित्यिक.

    १९५१ - अण्णासाहेब चिरमुले, भारतीय विमा उद्योजक.

    १९६९ - शाहीर अमर शेख, मराठी शाहीर.

    १९८२ - इंग्रीड बर्गमन, स्वीडीश अभिनेत्री.



ऑगस्ट ३०:



    १५७४ - गुरू रामदास सर्वोच्च शीख गुरू पदी.

    १८३५ - ऑस्ट्रेलियात मेलबर्न शहराची स्थापना.

    १८३५ - अमेरिकेत ह्युस्टन शहराची स्थापना.

    १९७४ - झाग्रेब मध्ये रेल्वे रुळांवरून घसरून १५३ ठार.

    १९८४ - स्पेस शटल डिस्कव्हरीचे पहिले अंतराळगमन.



जन्म:



    १३७७ - शाहरुख, पर्शियाचा राजा.

    १८५६ - कार्ल डेव्हिड टॉल्म रुंग, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.

    १९३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.

    १९३० - वॉरेन बफे, अमेरिकन उद्योगपती.

    १९३४ - बाळु गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू.





मृत्यू:



    १४२८ - शोको, जपानी सम्राट.

    १९४९ - आर्थर फील्डर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.





ऑगस्ट ३१:



    १८९७ - थॉमस अल्वा एडिसनने कायनेटोस्कोपचा पेटंट घेतला.

    १९६२ - त्रिनिदाद आणि टोबॅगोला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

    १९६८ - सर गारफील्ड सोबर्सने एका षटकात ६ षटकार फटकावले.

    २००५ - बगदादच्या अल-आइम्माह पूलावर झालेल्या चेंगराचेंगरीत १,१९९ ठार.



जन्म:



    १२ - कालिगुला, रोमन सम्राट.

    १५६९ - जहांगीर, मुघल सम्राट.

    १८७० - मारिया मॉँटेसोरी, इटालियन शिक्षणतज्ञ.

    १९४४ - क्लाइव्ह लॉईड,वेस्ट ईंडीझचे क्रिकेट खेळाडू.

    १९६९ - जवागल श्रीनाथ,भारतीय क्रिकेट खेळाडू.



मृत्यू:



    १४२२ - हेन्री पाचवा, इंग्लंडचा राजा.

    १९९५ -बियंत सिंग, पंजाबचा मुख्यमंत्री

    १९९७ - प्रिन्सेस डायना, ब्रिटीश राजकुमारी.

    १९९७ - डोडी फयेद, ब्रिटीश उद्योगपती.


Forum Jump:


Users browsing this thread: 1 Guest(s)