Facebook Share

Thread Rating:
  • 0 Vote(s) - 0 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
१ जून ते ३० जून पर्यंतचे दिनविशेष | On This Day in History | Dinvishesh
#1
जून १:



    १९२९ - प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना.

    १९४५ - टाटा मूलभूत संशोधन संस्थेची भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात स्थापना.



मृत्यू:



    १९३४ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक.

    १९९६ - नीलम संजीव रेड्डी, भारताचे सहावे राष्ट्रपती.

    १९९८ - गो. नी. दांडेकर, ज्येष्ठ साहित्यिक.



जून २:



जन्म:



    १९२९ - नर्गिस दत्त, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री .



मृत्यू:



    १७९५ - राणी अहिल्याबाई होळकर.

    १९५८ - कर्ट आल्टर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.

    १९८४ - नाना पळशीकर, प्रसिद्ध अभिनेते.

    १९८८ - राज कपूर, प्रसिद्ध अभिनेते, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक.



जून ३:



जन्म:



    १८९० - बाबूराव पेंटर,  चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, चित्रकार आणि शिल्पकार कलामहर्षी.

    १८९० - खान अब्दुल गफारखान, सरहद्ध गांधी.



मृत्यू:



    १९७७ - आर्किबाल्ड विविअन हिल, ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.

    २००० - डॉ. आर. एस. अय्यंगार, शास्त्रज्ञ व महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक.



जून ४: राष्ट्र सेवादल दिवस, हुतात्मा दिन, विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन



मृत्यू:



    १९३२ - धर्मानंद दामोदर कोसंबी, बौद्ध धर्माभ्यासक, पंडित.

    १९६२ - चार्ल्स विल्यम बीब  अमेरिकन निसर्गतज्‍ज्ञ.

    १९९८ - डॉ. अश्विन दासगुप्ता, इतिहासतज्‍ज्ञ, शिक्षणतज्‍ज्ञ.

    १९९८ - गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक.



जून ५: जागतिक पर्यावरण दिन



जन्म:



    १८७९ - नारायण मल्हार जोशी, भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक.

    १९०० - डेनिस गॅबॉर, हंगेरीयन, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.



मृत्यू:



    १९७३ - मा. स. गोळवलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक.

   १९८७ - ग. ह. खरे, इतिहासतज्‍ज्ञ.





जून ६:

जन्म:



    १८९१ - मारुती वेंकटेश अय्यंगार, कन्नड कवी, कथाकार कादंबरीकार.

    १९०९ - गणेश रंगो भिडे, अभिनव मराठी ज्ञानकोशकार.



मृत्यू:



    १९६१ - कार्ल गुस्टाफ युंग, स्विस मानसशास्त्रज्ञ.

    २००२ - शांता शेळके, मराठी कवियत्री.

    २००४ - रोनाल्ड रेगन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.





जून ७:



मृत्यू:



    १९७८ - रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड नॉरिश  ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.

    १९९२ - डॉ. स. ग. मालशे, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक.

    १९९८ - शशिकांत नार्वेकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष.

    २००२ - बी. डी. जत्ती, भारतीय उपराष्ट्रपती.





जून ८:



जन्म:



    १९१० - दिनकर केशव बेडेकर, तत्त्वचिंतक, समीक्षक.

    १९१७ - गजाननराव वाटवे, भावगीत गायक आणि संगीतकार.

    १९३६ - केनीथ गेडीज विल्सन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.



जून ९:

मृत्यू:



    १९९५ - प्रा. एन. जी. रंगा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू.



जून १०:

जन्म:



    १९०८ - जयंतनाथ चौधरी, भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल.

    १९३८ - राहुल बजाज, बजाज उद्योग समूहाचे प्रमुख.



मृत्यू:



    १९०३ - लुइगी क्रेमॉना, इटालियन गणितशास्त्रज्ञ.

    २००१ - फुलवंतीबाई झोडगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या.





जून ११:

मृत्यू:



    १९२४ - वासुदेवशास्त्री खरे, इतिहास संशोधक व नाटककार.

    १९५० - पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी, बालसाहित्यिक, समाजवादी नेते आणि स्वातंत्र्य सैनिक.

    १९८३ - घन:श्याम बिर्ला, भारतीय उद्योगपती.

    २००० - राजेश पायलट, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री.



जून १२:

जन्म:



    १८९४ - पुरुषोत्तम विश्वनाथ बापट, पाली भाषा कोविद, बौद्ध धर्मग्रंथ भाषांतरकार आणि संपादक.



मृत्यू:



    १९६४ - कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, मराठी भाषाभ्यासक.

    १९७५ - दुर्गाप्रसाद धर, स्वातंत्र्योत्तर काळातील एक मुत्सद्दी व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष.

    २००० - पु. ल. देशपांडे, मराठी साहित्यिक.

    २००१ - शकुंतला बोरगावकर, विनोदी लेखिका.





जून १३:

जन्म:



    १८७९ - गणेश दामोदर सावरकर, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.



मृत्यू:



    १९६१ - के. एम. कृष्णन, भौतिकशास्त्रज्ञ.

    १९६७ - विनायक पांडुरंग करमरकर, प्रसिद्ध शिल्पकार.

    १९६९ - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, पत्रकार, आमदार आणि वक्ता.

    १९८० - दादू इंदुरीकर, वगसम्राट.



जून १४:

जन्म:



    १३९८ - संत कबीर.

    १९६९ - स्टेफी ग्राफ, प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू.



मृत्यू:



    १९१६ - गोविंद बल्लाळ देवल, नाटककार नाट्यदिग्दर्शक.

    १९४६ - जॉन लोगीबेअर्ड, ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दुरचित्रवाणी संशोधक.

    १९८९ - सुहासिनी मुळगावकर, ज्येष्ठ अभिनेत्री व संस्कृत पंडित.





जून १५:

जन्म:



    १८९८ - डॉ. ग. श्री. खरे, शिक्षणतज्ज्ञ व गीताभ्यासक.

    १९२९ - सुरैय्या, अभिनेत्री आणि गायिका.

    १९३८ - अण्णा हजारे, समाजसेवक.



मृत्यू:



    १९३१ - अच्युत बळवंत कोल्हटकर, संदेशकार.

    १९७१ - वेंडेल मेरेडिथ स्टॅनले, अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.





जून १६:

    १८५८ - अठराशे सत्तावनच्या संग्रामातील मोरारची लढाई



जन्म:



    १९९४ - आर्या आंबेकर, प्रसिद्ध गायिका.



    १९२० - हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार.



मृत्यू:



    १९२५ - देशबंधू चित्तरंजन दास, ज्येष्ठ नेते व बंगालमधील नामवंत कायदेपंडित.

    १९७७ - श्रीपाद गोविंद नेवरेकर, मराठी रंगभुमीवरील लोकप्रिय गायक, नट.



जून १७:

मृत्यू:



    १८५८ - झाशीच्या राणी लक्ष्मीबाई इंग्रजांच्या विरूद्ध चकमकीत धारातीर्थी.

    १८९५ - गोपाळ गणेश आगरकर, ज्येष्ठ समाजसुधारक, विचारवंत.

    १९९६ - मधुकर दत्तात्रेय देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक.

    २००४ - इंदुमती पारीख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या.



जून १८:

मृत्यू:



    १९०१ - रामचंद्र भिकाजी गुंजीकर, विविध ज्ञानविस्तार संपादक.

    १९७१ - पॉल कारर  स्विस रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.

    १९९९ - श्रीपाद रामकृष्ण काळे, कादंबरीकार कथाकार.

    २००३ - जानकीदास, चरित्र अभिनेता.



जून १९:

जन्म:



    १८९६ - वॉलिस सिम्प्सन, इंग्लंडचा राजा एडवर्ड आठव्याची पत्नी.

    १९०३ - वॉली हॅमंड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

    १९४७ - सलमान रश्दी, ब्रिटीश लेखक.

    १९७० - राहुल गांधी, भारतीय राजकारणी.



जून २०:



जन्म:



    १८६९ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक



मृत्यू:



    १९१७ - जेम्स मेसन क्राफ्ट्स, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.

    १९९७ - बासू भट्टाचार्य (चित्रित), चित्रपट दिग्दर्शक.

    १९९७ - वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर, मराठी कवी.

    २००८ - चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट, चित्रपट अभिनेता.



जून २१: उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस,सूर्याचे दक्षिणायन सुरू.





जन्म:



    १९२३ - सदानंद रेगे, मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक.



मृत्यू:



    १९२८ - द्वारकानाथ माधव पितळे तथा नाथमाधव, मराठी कादंबरीकार.

    १९५७ - योहान्स स्टार्क, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.

    १९८४ - अरुण सरनाईक, मराठी चित्रपट अभिनेता.





जून २२:

    १८९७ - चार्ल्स रॅंड याला दामोदर हरी चाफेकर यांनी पुण्यातील जुलमाचा वचपा म्हणून बंदुकीने गोळ्या घातल्या.



जन्म:



    १८९६ - बाबुराव पेंढारकर, मराठी चित्रपट अभिनेता.

    १९०८ - डॉ. विष्णू भिकाजी कोलते, महानुभाव साहित्यसंशोधक.



मृत्यू:



    १९४० - ब्लाडिमार पी. कोपेन, रशियन हवामानशास्त्रज्ञ.

    २००१ - डॉ. अरुण घोष, अर्थतज्ञ.



जून २३:

    १९८५ - एअर इंडियाचे विमान कनिष्कवर बॉंबहल्ला.



मृत्यू:



    १८९१ - विल्हेल्म एडवर्ड वेबर  जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.

    १९५३ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे संस्थापक, अध्यक्ष, शिक्षणतज्‍ज्ञ.

    १९७५ - जनरल प्राणनाथ थापर, भारताचे भूसेनाप्रमुख.

    १९८२ - हरिभाऊ देशपांडे, गंधर्व युगातील ऑर्गनवादक.





जून २४:

    १९९६ - मायकेल जॉन्सन याने १९.६६ सेकंदात २०० मीटर धावून जागतिक विक्रम केला



जन्म:



    १९०९ - गुरू गोपीनाथ, प्रसिद्ध शास्त्रीय नर्तक.

    १९२७ - कवियरासू कन्नदासन, तमिळ कवी, गीतकार.





जून २५: मोझांबिकचा स्वातंत्र्यदिवस



    १९५० - कोरियन युद्धाची सुरूवात. उत्तर कोरियन सैन्याचे दक्षिण कोरियावर आक्रमण.

    १९७५ - भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशव्यापी आणीबाणी लागू केली.

    १९८३ - कपिल देवच्या नेतृत्वाखाली १९८३ क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारत विजयी.



जन्म:



    १९३१ - विश्वनाथ प्रताप सिंग, भारताचे सातवे पंतप्रधान.

    १९७४ - करिश्मा कपूर, बॉलिवूड अभिनेत्री.



मृत्यू:



    १९७१ - जॉन बॉयड ऑर, स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ.



जून २६: मादागास्करचा स्वातंत्र्यदिवस



    १९०६ - जगातील पहिली ग्रांप्री शर्यत फ्रान्सच्या ले मां शहराजवळ भरवली गेली.

    १९४५ - सॅन फ्रान्सिस्को येथे ५० राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी अधिकारपत्रावर सह्या करून संयुक्त राष्ट्रांच्या निर्मितीस संमती दिली.

    १९६३ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी ह्यांनी पश्चिम बर्लिन येथे Ich bin ein Berliner हे प्रसिद्ध भाषण दिले.



जन्म:



    १८७४ - शाहू महाराज

    १८३८ - बंकिमचंद्र चटर्जी, आद्य बंगाली कादंबरीकार.

    १८८८ - नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक.



मृत्यू:



    १९४४ - प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.

    २००१ - व.पु. काळे, मराठी साहित्यिक.



जून २७: जिबूतीचा स्वातंत्र्यदिवस:



    ६७८ - पोप अगाथोच्या पोपपदाची सुरूवात.

    १५७१ - इंग्लंडची राणी पहिली एलिझाबेथने ऑक्सफर्ड विद्यापीठात पहिले प्रोटेस्टंट कॉलेज स्थापन करण्याचा हुकुम जारी केला.



जन्म:



    १८६४ - शिवराम महादेव परांजपे, प्रखर राष्ट्रीय नेते आणि काळ या साप्ताहिकाचे संपादक.

    १८६९ - हॅन्स स्पेमन, जर्मन प्राणीशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.



मृत्यू:



    १८३९ - रणजितसिंग, पंजाबातील शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक.

    २००२ - कृष्णकांत, भारतीय उपराष्ट्रपती.



जून २८:





    १९१४ - ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड ह्याची सारायेव्होमध्ये हत्या. पहिल्या महायुद्धाची सुरूवात.

    १९१९ - व्हर्सायच्या तहावर स्वाक्षऱ्या.



जन्म:



    १९२१ - पी.व्ही. नरसिंहराव, भारतीय पंतप्रधान.

    १९२६ - मेल ब्रूक्स, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता.



मृत्यू:



    १९१५ - व्हिक्टर ट्रम्पर, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.

  १९७८ - क्लिफर्ड ड्युपॉँट, र्‍होडेशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.



जून २९: सेशेल्सचा स्वातंत्र्यदिन



    १९५६ - अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ड्वाइट आयझेनहॉवरने इंटरस्टेट हायवे सिस्टमची  स्थापना केली.

    २००७ - ॲपलद्वारे पहिल्या पहिल्या आयफोनची विक्री सुरू.



जन्म:



    १८७१ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मराठी नाटककार, विनोदकार, व वाङ्मय समीक्षक.

    १९३४ - कमलाकर सारंग, प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते.



मृत्यू:



    १८९५ - थॉमस हेन्री हक्सले, ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ.

    २००० - कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर, प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार.



जून ३०: काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक देशाचा स्वातंत्र्यदिन



    १८९४ - लंडनमधील टॉवर ब्रिजचे उद्घाटन

    १९०५ - अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सापेक्षता सिद्धांतावरील लेख प्रसिद्ध केला.



मृत्यू:



    १९१७ - दादाभाई नौरोजी, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ.

    १९१९ - जॉन विल्यम स्टूट रॅले, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.

    १९३४ - चिंतामणी नागेश रामचंद्र राव, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.

    १९९४ - बाळ कोल्हटकर, प्रसिद्ध नाटककार, कवी.


Forum Jump:


Users browsing this thread: 1 Guest(s)