Facebook Share

Thread Rating:
  • 0 Vote(s) - 0 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
१ मे ते ३१ मे पर्यंतचे दिनविशेष | On This Day in History | Dinvishesh
#1
मे १: कामगार दिन, महाराष्ट्र दिन, गुजरात दिन





    १९६० - द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.



जन्म:



    १९४४ - सुरेश कलमाडी, भारतीय राजकारणी.

    १९५१ - गॉर्डन ग्रीनीज, वेस्ट इंडीझचा क्रिकेट खेळाडू.



मृत्यू:



    १९९३ - रणसिंगे प्रेमदास, श्रीलंकेचा पंतप्रधान.



मे २:



    १५५९ - जॉन नॉक्स स्कॉटलंडला परतला व त्याने तेथे प्रोटेस्टंट सुधारणेची सुरूवात केली.

    १९४५ - दुसरे महायुद्ध: नाझी सेनापतीने सोव्हियेत सेनेसमोर शरणागती पत्कारली व बर्लिनची लढाई संपुष्टात आली.

    १९९५ - क्रोएशिया स्वातंत्र्ययुद्धात सर्बियन सेनेने झाग्रेबवर रॉकेट हल्ला केला.



जन्म:



    १९६९ - ब्रायन लारा, वेस्ट इंडीझचा क्रिकेट खेळाडू.



मे ३:





    १४९४ - क्रिस्टोफर कोलंबसला पहिल्यांदा जमैकाचा किनारा दिसला.

    १९१३ - पहिला भारतीय मूक चित्रपट राजा हरिश्चंद्र मुंबईत प्रदर्शित झाला.



जन्म:



    १८९८ - चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर, मराठी चित्रपट दिग्दर्शक.



मृत्यू:



    २००० - शकुंतलाबाई परांजपे, कुटुंब-नियोजनासाठी कार्य केलेल्या समाजसेविका





मे ४:



मृत्यू:



    १७९९ - टिपू सुलतान.

    १९८० - जोसेफ ब्रोझ टिटो, युगोस्लाव्हियाचा राष्ट्राध्यक्ष.



मे ५:



जन्म:



    १९१६ - ज्ञानी झैलसिंग, भारतीय राष्ट्रपती.



मृत्यू:



    १८२१ - नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचा सम्राट.



मे ६:



मे ७:



जन्म:



    १८६१ - रवींद्रनाथ टागोर, जगद्विख्यात कवी, कलावंत आणि तत्त्वचिंतक.

    १८८० - डॉ. पांडुरंग वामन काणे, कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, भारतरत्न.

    १९२३ - आत्माराम भेंडे, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक.



मृत्यू:



    २००२ - दुर्गाबाई भागवत मराठी लेखिका, लोकसंस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, लेखन-विचार-स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या.



मे ८: जागतिक रेडक्रॉस दिन



    १८९९ - क्रांतिकारी वासुदेव चाफेकर यांना फाशी.

    १९३३ - महात्मा गांधींचे २१ दिवसांचे उपोषण चालू.



मृत्यू:



    १९८२ - कवी अनिल  मराठी कवी.



मे ९:



जन्म:



    १८१४ - दादोबा पांडुरंग तर्खडकर, मराठी व इंग्रजी व्याकरणकार, ग्रंथकार.

    १८६६ - नामदार गोपाळ कृष्ण गोखले, थोर समाजसेवक.



मृत्यू:



    १९५९ - कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक.

    १९९८ - तलत मेहमूद, हिंदी चित्रपट पार्श्वगायक.



मे १०:



    १८५७ - भारतीय सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध केलेल्या उठावाने अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराची सुरुवात.



जन्म:



    १९४० - प्रसिद्धी-परान्मुख कवी ग्रेस.



मृत्यु:



    १९९८ - सुप्रसिद्ध पत्रकार व संपादक यदुनाथ थत्ते.





मे ११: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन



    १८८८ - मुंबईच्या मांडवी भागातील कोळीवाडा येथे समाजसुधारक जोतिबा फुले यांना 'महात्मा' ही पदवी देण्यात आली.

    १८८७ - गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.

    १९९८ - भारताने राजस्थानातील पोखरण येथे पोखरण २ हे परमाणुपरीक्षण केले.



जन्म:



    १८९५ - जे. कृष्णमूर्ती, भारतीय विचारवंत व तत्त्वज्ञ.

    १९९१४ - ज्योत्स्ना भोळे, गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री.



मे १२: जागतिक परिचारिका दिन



    इ.स. १९४९ - सयामचे नाव बदलून थायलंड करण्यात आले.

    इ.स. १९५२ - प्रजासत्ताक भारताचे पहिले संसदीय अधिवेशन सुरू.



जन्म :



    इ.स. १८२० - फ्लॉरेन्स नाइटिंगेल  आधुनिक शुश्रूषाशास्त्राच्या संस्थापिका; ब्रिटिश परिचारिका.

    इ.स. १९३३ - नंदकुमार महादेव नाटेकर, भारतीय बॅडमिंटनपटू.



मे १३: राष्ट्रीय एकता दिन, जागतिक ताणतणाव दिन



फक्रुद्दीन अली अहमद



    १९०५ - भारताचे पाचवे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचा जन्म.

    १९९६ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक भाऊराव ऊर्फ मधुकर दत्तात्रेय देवरस यांचे निधन.

    २००१ - रासिपुरम कृष्णस्वामी उर्फ आर. के. नारायण यांचे निधन.





मे १४:



जन्म:



    छत्रपती संभाजी महाराज.



मृत्यू:



    १९२३ - नारायण गणेश चंदावरकर, अखिल भारतीय काँग्रेसच्या आद्य संस्थापकांपैकी एक, कायदेपंडित व समाजसुधारक.

    १९२३ - डॉ. रघुवीर, वैदिक, संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार आणि कोशकार.





मे १५: विश्व कुटुंबसंस्था दिन



जन्म:



    १८१७ - देवेंद्रनाथ टागोर, बंगाली समाजसुधारक.

    १९१४ - तेनसिंग नोर्गे, एडमंड हिलरीसह एव्हरेस्ट वर प्रथम चढाई करणारा.



मृत्यू:



    १९९३ - फील्डमार्शल के. एम. करिअप्पा, स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख.

    १९९४ - पी. सरदार, चित्रकार व दिनदर्शिका चित्र निर्माते.



मे १६:



    १९७५ - सिक्कीममधील जनतेने कौल दिल्यावर भारताने सिक्कीमला देशाचा भाग करुन घेतले.



जन्म:



    १९२६ - माणिक वर्मा, शास्त्रीय तसेच सुगम संगीतात लोकप्रिय असलेल्या गायिका.

    १९३१ - के. नटवर सिंग (चित्रित), भारतीय परराष्ट्र मंत्री.



मृत्यू:



    १९५० - अण्णासाहेब लठ्ठे, कोल्हापूर संस्थानचे दिवाण व खरे मंत्रिमंडळातील अर्थमंत्री.

    १९९४ - माधव मनोहर, मराठी लेखक आणि समीक्षक.



मे १७: जागतिक दूरसंचार दिन



    इ.स. १८६५ - आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) स्थापन झाला.



मृत्यू:



    इ.स. १८४६ - बाळशास्त्री जांभेकर, मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक, दर्पणकार.

    इ.स. १९७२ - रघुनाथ कृष्ण फडके, शिल्पकार.

    इ.स. २००४ - कमिला तय्यबजी  वकील व समाजसेविका.



मे १८: जागतिक संग्रहालय दिन



    १९७४ - भारताने पोखरण १ परमाणु परीक्षण केले. आण्विकसामर्थ्य असणारा सहावा देश बनला.



जन्म:



    १९३३ - एच. डी. देवेगौडा, भारताचे तेरावे पंतप्रधान.



मृत्यू:



    १९८६ - कानरू लक्ष्मण राव, स्थापत्य अभियंता.

    १९९७ - कमलाबाई रघुनाथराव गोखले, भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रथम स्त्री-कलाकार.





मे १९:



    इ.स. १९०४ - आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे निधन

    इ.स. १९१३ - भारताचे सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म

    इ.स. १९३८ - प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचा जन्म

    इ.स. १९५८ - नामवंत इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचे निधन



मे २०:



    संत चोखामेळा यांचे निधन

    इ.स. १७६६ - इंदूर संस्थानचे संस्थापक श्रीमंत सरदार मल्हारराव होळकर यांचे निधन

    इ.स. १८५० - आधुनिक मराठी गद्याचे जनक श्रेष्ठ ग्रंथकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म

    इ.स. १९३२ - भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बंगाली नेते बिपिनचंद्र पाल यांचे निधन

    इ.स. १९९४ - महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कासू ब्रह्माणंद रेड्डी यांचे निधन

    इ.स. २००० - प्रसिद्ध उद्योगपती एस. पी. गोदरेज यांचे निधन



मे २१: दहशतवाद विरोधी दिन



जन्म:



    १९२८ - ज्ञानेश्वर नाडकर्णी, कलासमीक्षक व लेखक.



मृत्यू:



    १९७३ - बाळकृष्ण ढवळे, मराठी मुद्रण व प्रकाशन क्षेत्रातील व्यावसायिक.

    १९९१ - राजीव गांधी, भारताचे माजी पंतप्रधान (श्रीपेराम्बदुर येथे हत्या).

    २००२ - सुलतान अहमद, चित्रपट-निर्माते व दिग्दर्शक.



मे २२:



जन्म:



    १७७२ - राजा राममोहन रॉय, आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक, समाजसुधारक आणि ब्राह्मो समाजाचे संस्थापक.

    १८७१ - विष्णू वामन बापट, संस्कृत-मराठी अनुवादक.



मृत्यू:



    १९९१ - श्रीपाद अमृत डांगे, साम्यवादी नेता व कामगार पुढारी.

    २००३ - डॉ. नित्यनाथ ऊर्फ नीतू मांडके, हृदयरोगतज्ञ.



मे २३:



    १९८४ - बचेंद्री पाल  या भारतीय महिलेचे एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी पदार्पण.

    १९९५ - जावा संगणक भाषेची अधिकृत घोषणा.

    २००१ - एव्हरेस्ट शिखर प्रथमच भारतीय लष्कराच्या पथकाकडून सर.



जन्म:



    १८९६ - केशवराव भोळे, मराठी संगीत समीक्षक, संगीतकार, संगीत दिग्दर्शक, लेखक.



मे २४:



    १८४४ - सॅम्युएल मॉर्स  याने तारयंत्र वापरून पहिला संदेश पाठवला.



जन्म:



    १८९९ - काझी नजरूल इस्लाम, क्रांतीवादी बंगाली मुस्लिम कवी आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रभावी समर्थक.

    १९२४ - रघुवीर भोपळे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार.



मृत्यू:



    १९९९ - गुरू हनुमान तथा विजयपाल लालाराम, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कुस्ती मार्गदर्शक.

    २००० - मजरुह सुलतानपुरी, गीतकार आणि उर्दू शायर.



मे २५:



    १९५५ - जगातील उंचीनुसार तिसरे शिखर कांचनगंगा जॉर्ज बॅंड आणि जो ब्राऊन यांनी प्रथमच सर केले.



मृत्यू:



    १९२४ - आशुतोष मुखर्जी, बंगालचे शिक्षणतज्ज्ञ.

    १९९९ - डॉ. बी. डी. टिळक पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे माजी संचालक, शास्त्रज्ञ.

    २००१ - नीला घाणेकर, गायिका.



मे २६:



    १९८६ - युरोपीय संघातील देशांनी युरोपचा झेंडा स्वीकारला.



जन्म:



    १८८५ - राम गणेश गडकरी, मराठी नाटककार, कवी आणि विनोदी लेखक.

    १९०६ - बेंजामिन पिअरी पाल, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी वैज्ञानिक व संशोधक.



मृत्यू:



    २००० - प्रभाकर शिरुर, चित्रकार.





मे २७:



जन्म:



    १९३८ - डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे, आघाडीचे कादंबरीकार, कवी, मर्मग्राही समीक्षक.



मृत्यू:



    १९६४ - पंडित जवाहरलाल नेहरू, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान.

    १९८६ - प्रा. अरविंद मंगरुळकर, संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक

    १९९४ - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक.



मे २८:



जन्म:



    १८८२ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर क्रांतिकारक, वक्ते, कवी, नाटककार, लेखक.

    १९०३ - शंतनुराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती.

    १९२३ - एन. टी. रामाराव, तेलुगू अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक , आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री.



मृत्यू:



    १९६१ - प. कृ. गोडे, प्राच्यविद्या संशोधक.



मे २९:



    १९५३ - एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी एव्हरेस्ट सर केले.



जन्म:



    १९०५ - हिराबाई बडोदेकर, किराणा घराण्याच्या गायिका.



मृत्यू:



    १९७२ - पृथ्वीराज कपूर, हिंदी चित्रपटअभिनेता.

    १९८७ - चरण सिंग, लोकदलाचे संस्थापक, भारतीय पंतप्रधान.



मे ३०:



मृत्यू:



    देवदत्त रामकृष्ण भांडारकर, प्राच्यविद्या संशोधक.

    १९६८ - सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार.

    १९८१ - झिया उर रहमान  बांग्लादेशी राष्ट्रपती(हत्या).





मे ३१: जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन



जॉन रॉबर्ट श्रीफर



जन्म:



    १९१० - भा. रा. भागवत, मराठी बालसाहित्यकार आणि विज्ञान कथाकार.

    १९३१ - जॉन रॉबर्ट श्रीफर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.



मृत्यू:



    १८७४ - भाऊ दाजी लाड, प्राच्यविद्यापंडित आणि समाजसेवक.

    २००२ - सुभाष गुप्ते भारतीय क्रिकेट खेळाडू.


Forum Jump:


Users browsing this thread: 1 Guest(s)