Facebook Share

Thread Rating:
  • 0 Vote(s) - 0 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
१ जानेवारी ते ३१ जानेवारी पर्यंतची दिनविशेष| On This Day in History | Dinvishesh
#1
जानेवारी १:

महात्मा जोतिबा फुले    १८१८ - भीमा कोरेगाव येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन एफ.ए‍फ. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखालील फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसर्‍या बाँबे नेटिव्ह इन्फन्ट्री बटालियनने पेशव्यांच्या नेतृत्वाखालील २५,००० संख्याबळाच्या मराठा साम्राज्याच्या सैन्याचा पराभव केला.

    १८४८ - महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.

    १८६२ - इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.

  १९१९ - गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमंलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.

    १९३२ - डॉ. नारायण भिकाजी परुळेकर यांनी सकाळ हे वृत्तपत्र सुरू केले.जन्म:    १८९२ - महादेव हरिभाई देसाई (गांधीवादी कार्यकर्ते).

    १८९४ - सत्येंद्रनाथ बोस (भारतीय भौतिकशास्त्रज्ञ).

    १९०२ - कमलाकांत वामन केळकर (भारतीय भूवैज्ञानिक).

    १९३६ - साहित्यिक राजा राजवाडे

    १९४३ - डॉ. रघुनाथ माशेलकर, भारतीय शास्त्रज्ञ.

    १९५१ - नाना पाटेकर, अभिनेते, दिग्दर्शक.मृत्यू :    १७४८ - योहान बर्नोली (स्विस गणितज्ञ).

    १९५५ - डॉ. शांतीस्वरुप भटनागर.जानेवारी २:कोलकाता    १७५७ - ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता जिंकून आपल्या साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली.

    १९५४ - भारतरत्न या सर्वोच्च किताबाची स्थापना तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केली.जन्म:    १९४० - श्रीनिवास वरधन, भारतीय गणितज्ञ.मृत्यू:    १९४४ - समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे.

    

जानेवारी ३:    १५२१ - पोप लिओ दहाव्याने पोपचा फतवा काढून मार्टिन ल्यूथरला वाळीत टाकले.जानेवारी ४:    १८८१ - लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले.जन्म:    १९०९ - प्रभाकर पाध्ये, मराठी नवसाहित्यिक.

    १९१४ - इंदिरा संत, मराठी कवियत्री.

    १९४० - श्रीकांत सिनकर, मराठी कादंबरीकार.मृत्यू:    १९९४ - राहुल देव बर्मन, भारतीय संगीतकार.जानेवारी ५:    १६७१ - छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेर मुघलांकडून काबीज केले.

    १८६९ - कन्नड साहित्यिक वेंकटेश तिरको कुलकर्णी यांचा जन्म.

    १९२४ - महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले केले.

    १९५५ - बंगाली राजकारणी ममता बॅनर्जी यांचा जन्म.जानेवारी ६:    १८३८ - सॅम्युएल मॉर्सने तारयंत्राचा शोध लावला.जन्म:    १९२५ - रमेश मंत्री, मराठी विनोदी लेखक.

    १९२८ - विजय तेंडुलकर, ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक, चित्रपटकथा लेखक.

    १९५९ - कपिलदेव निखंज, भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू.

जानेवारी ७:जन्म:    १९२१ - चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता.

    १९४८ - शोभा डे  भारतीय लेखिका .

    १९५० - जॉनी लिव्हर, अभिनेता.

जानेवारी ८:    २००६ - मराठी साहित्यिक विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.मृत्यू :    १६४२ - गॅलेलियो, खगोलशास्त्रज्ञ

जानेवारी ९:    १९९१ - स्वतंत्र होउ पाहणार्‍या लिथुएनियावर  सोवियेत संघाच्या सैन्याने हल्ला केला.जानेवारी १०:    १७३० - पहिल्या बाजीरावने पुण्यात शनिवारवाडा बांधायला सुरुवात केली.

    १८४० - इंग्लडने पेनी पोस्ट सेवा सुरू केली.

    १९२० - जिनिव्हा येथे राष्ट्रसंघाची स्थापना झाली. याच दिवशी युनोचे पहिले अधिवेशन भरले.

    १९२९ - टिनटिनच्या चित्रकथेचा पहिला अंक प्रकाशित झाला.जन्म :    १८९६ - काकासाहेब तथा नरहर विष्णू गाडगीळ (भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी साहित्यिक, वक्ता).

    १९२७ - शिवाजी गणेशन (तमिळ चित्रपट अभिनेता).

    १९४० - येशू दास, भारतीय पार्श्वगायक.

    १९७४ - हृतिक रोशन (भारतीय चित्रपट अभिनेता).मृत्यू :    १७६० - कुतुबशहाने दत्ताजी शिंदे यांचा शिरच्छेद केला.जानेवारी ११:

    १९८० - वयाच्या १४व्या वर्षी नायजेल शॉर्टने बुद्धिबळाच्या खेळातील इंटरनॅशनल मास्टरचा किताब पटकावला.जानेवारी १२:    १८६३ - भारतीय तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद यांचा जन्म.जानेवारी १३:    १९३८ - चर्च ऑफ इंग्लंडने(मानचिह्न चित्रित) उत्क्रांतिवादाचा सिद्धांत खरा असल्याचे मान्य केले.जानेवारी १४ : मकरसंक्रांत    १६९० - जर्मनीच्या न्युरेम्बर्ग शहरात पहिले क्लॅरिनेट तयार केले गेले.जानेवारी १५:    १९७५ - अँगोलाला (राष्ट्रध्वज चित्रित) पोर्तुगाल पासून स्वातंत्र्य.जन्म:    १९५६ - मायावती, भारतीय राजकारणी.मृत्यू:    १९९८ - गुलझारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते.जानेवारी १६:    १९७९ - इराणच्या शहा मोहम्मद रझा पेहलवीने कुटुंबासहित इजिप्तला पळ काढला.

जानेवारी १७:

    १९९५ - जपानच्या कोबे शहरात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.२ तीव्रतेचा भूकंप. ६,४०० पेक्षा अधिक व्यक्ती मृत, १,००,००,००,००,००,००० (१ शंकु अथवा दहा हजार अब्ज) जपानी येनचे नुकसान.जानेवारी १८:    १९१२ - इंग्लिश शोधक रॉबर्ट एफ. स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोचला. त्याच्या दुर्दैवाने रोआल्ड अमुंडसेन त्याआधी महिनाभर तेथे पोचला होता. स्कॉट व त्याचे सहकारी परतताना मृत्यू पावले.

जानेवारी १९:    १९६६ - इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधानपदी.जन्मः    १७३६ - जेम्स वॅट, वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ.

    १८९२ - चिंतामण विनायक जोशी, मराठी विनोदी लेखक.

    १९०७ - मास्टर विनायक मराठी अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते.मृत्यू:    १५९७ - महाराणा प्रताप, राजस्थानातील ऐतिहासिक योद्घा, लढवय्या.जानेवारी २०:    १९२१ - तुर्कस्तानचे (राष्ट्रध्वज चित्रित) पहिले संविधान अस्तित्त्वात आले.जन्म:    १८७१ - सर रतनजी जमशेदजी टाटा, भारतीय उद्योगपती.

जानेवारी २१:त्रिपुरा    १९७२ - ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्याची स्थापना.जन्म:    १८९४ - माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव ज्युलियन, मराठी कवी.

    १९१० - शांताराम आठवले, कवी व चित्रपट दिग्दर्शक.

    १९२४ - प्रा.मधू दंडवते, ज्येष्ठ समाजवादी नेते व संसदपटू.जानेवारी २२:मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया    १९६४ - मुंबईत ७.४o सेल्सियस हा तापमानाचा नीचांक नोंदला गेला.जानेवारी २३:    इ.स. १५५६ - चीनच्या षा'न्शी प्रांतात प्रचंड भूकंप. अंदाजे ८,३०,००० ठार.जन्म    इ.स. १८९७ - सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी.

जानेवारी २४:    इ.स. १९६६ -एर इंडियाचे बोईंग ७०७ जातीचे विमान युरोपमधील मोंट ब्लांक या सर्वोच्च शिखरावर कोसळले. ११७ ठार. मृतांत होमी भाभा.जानेवारी २५:    १९१९ - पहिल्या महायुद्धाच्या अंतानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना.

    १९८० - सोलापूरचे पंचांगकर्ते लक्ष्मणशास्त्री दाते यांचे निधन.

    २००१ - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईवाझ उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर.जानेवारी २६ : भारतीय प्रजासत्ताक दिन    १९५० - स्वतंत्र भारत प्रजासत्ताक झाले.

    १७८८ - ऑस्ट्रेलियातील सिडने शहराची स्थापना. हाच ऑस्ट्रेलिया स्थापना दिन मानला जातो.जानेवारी २७:    १९६७ - केनेडी अंतराळ केंद्रात अपोलो १ या अंतराळयानाच्या चाचणी दरम्यान आग. गस ग्रिसम, एडवर्ड व्हाइट व रॉजर शॅफी हे अंतराळवीर मृत्युमुखी.

जानेवारी २८:    १९८६ - अंतराळ यान(स्पेस शटल) चॅलेंजरचा उड्डाण करताना विस्फोटात विनाश. सात अंतराळयात्र्यांचा मृत्यू.

    २००३ - मंगेश पाडगावकरांना जनस्थान पुरस्कार जाहीर.जन्म:    १८६५ - लाला लजपतराय, भारतीय क्रांतिकारी.

जानेवारी २९:

    १७८० - हिकीज बेंगाल गॅझेट हे भारतातील पहिले वर्तमानपत्र सुरु.

    १९६४ - ऑस्ट्रियाच्या इन्सब्रुक शहरात नववे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू. (चित्रित)महात्मा गांधी    १६४९ - इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद.

    १६६१ - ऑलिव्हर क्रॉमवेल, ज्याच्या राजवटीत चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद झाला, त्याचा स्वतःचा शिरच्छेद केला गेला. क्रॉमवेल २ वर्षांपूर्वीच मृत्यू पावला होता.

    १८३५ - रिचर्ड लॉरेन्स नावाच्या माथेफिरू माणसाने अमेरिकेचा अध्यक्ष अँड्रु जॅक्सनचा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले.

    १९११ - जॅक्सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा.

    १९४८ - नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने खून केला.जानेवारी ३१:

    १९६८ - नौरूला ऑस्ट्रेलिया पासून स्वातंत्र्य.जन्म:    १९७५ - प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

    १९३१ - गंगाधर महांबरे, मराठी गीतकार.मृत्यू:    २००४ - सुरैय्या, गायिका व अभिनेत्री.


Forum Jump:


Users browsing this thread: 1 Guest(s)